पशु रोग नियंत्रण योजनेसह स्वच्छता हीच सेवा अभियानाचा शुभारंभ !

0

मथुरा: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशातील मथुरा दौऱ्यावर आहेत. विविध विकास कामांचे आणि कार्यक्रमांचे त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण योजना, स्वच्छता हीच सेवा अभियानासह विविध कामाचे अनावर मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी प्लास्टिक मुक्त भारतासह ‘जय किसान’चा नारा दिला. ‘शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी शेतीशी निगडीत पर्यायांवर सरकार पाच वर्षांपासून काम करत आहे’, असे मोदी यांनी यावेळी बोलताना मोदींनी सांगितले.

दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील मथुरेचा दौरा केला. मोदी यांनी विविध विकास कामांचे भूमिपूजनासह शेतकऱ्यांसाठीच्या राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण योजनेची घोषणा केली.

“महात्मा गांधी यांची १५०वी जयंती साजरी होत असून हे वर्ष प्रेरणादायी वर्ष आहे. स्वच्छता हीच सेवा या अभियानाच्या मागे तिच भावना दडलेली आहे. आजपासून सुरू होत असलेले हे अभियान प्लास्टिक कचऱ्यापासून मुक्तीला समर्पित केले आहे. प्लास्टिकपासून निर्माण होणाऱ्या समस्या गंभीर होत चालल्या आहेत. प्लास्टिक पशुधनाच्या मृत्यूचे कारण होऊ लागले आहे. त्याचप्रमाणे नद्या आणि तलावात राहणाऱ्या प्राणी प्लास्टिक खाल्यावर जिवंत राहणे अवघड आहे. आम्हाला प्लास्टिक वापरापासून पूर्ण मुक्ती मिळवावीच लागेल. त्यासाठी २ ऑक्टोबरपर्यंत घर, कार्यालय आणि आपल्या आजूबाजूचा परिसर प्लास्टिक मुक्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे”, असे आवाहन मोदी यांनी यावेळी केले.

शेतकऱ्यांच्या दुप्पट उत्पन्नाविषयी बोलताना मोदी म्हणाले, “आज राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण योजनेची सुरूवात करण्यात आली आहे. पशुधनाच आरोग्य, पोषण, दूग्ध उद्योग आणि अन्य योजनाही सुरूवात करण्यात आली आहे. पर्यावरण व विकासाचे संतुलन राखण्यासाठी कृषि आणि पशुपालनाला प्रोत्साहन दिले जात आहे. पर्यावरण आणि पशुधनाशिवाय आपली दैवत जसे अपूर्ण दिसतात, तिच अपूर्णता आपल्याला भारतात दिसेल. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यात पशुपालन आणि इतर व्यवसायांचा मोठा वाटा आहे. पशुपालन, मत्स्यपालन अथवा मधमाशी पालन यामध्ये केलेली गुंतवणूक जास्त मोबदला देते. गेल्या पाच वर्षात सरकारने शेतीशी निगडीत दुसऱ्या पर्यांयावर नव्या दृष्टिकोनातून काम सुरू केले आहे”, असेही मोदी म्हणाले.