इंडोनेशियात मोदींची पंतगबाजी

0

नवी दिल्ली – भारत आणि इंडोनेशियाची भागिदारी ही एक महत्वपूर्ण शक्ती आहे. ही केवळ भारत-प्रशांत भागातच सहाय्यक नाही, तर शांततेच्या दृष्टीनेही महत्वाची ठरू शकते, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. ते जकार्ता दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विदोदो यांच्यासोबत पतंग उडवण्याचाही आनंद घेतला. पीएम मोदी म्हणाले, भारत दहशतवादाविरुद्धच्या लढाईत इंडोनेशियासोबत खंबीरपणे उभा आहे. आम्ही नुकताच इंडोनेशिया येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करतो. यात अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला.

समुद्रीय शेजारी देशांदरम्यानचे राजकीय, आर्थिक आणि सामरिक हित मजबूत करणे, हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंडोनेशिया दौऱ्याचा हेतू आहे. मोदी यांनी येथे राष्ट्रपती जोको विदोदो यंच्याशी चर्चा केली. समुद्र, व्यापार आणि गुंतवणुकीसह विविध क्षेत्रात द्विपक्षीय संबंधांवर चर्चा झाली. जोको विदोदो यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर मोदी म्हणाले, ‘भारत आणि इंडोनेशिया आपले संबंध व्यापक रणनीतीक भागिदारीपर्यंत घेऊन जातील.