पंतप्रधान मोदी दोन दिवस रामलीलावरील अस्थायी पीएमओतून करणार कामकाज

0

नवी दिल्ली-पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील रामलीला मैदानावर बनविण्यात आलेल्या अस्थायी स्वरूपातील पीएमओतून कामकाज करणार आहे. ११ व १२ जानेवारीला रामलीला मैदानावर भाजपची राष्ट्रीय बैठक होणार आहे. यावेळी मोदी रामलीला मैदानावरून काम करणार आहे. या बैठकीला मोदी दोन दिवस उपस्थित राहणार आहे. त्यामुळे तेथूनच ते कामकाज करणार आहे. या कार्यालयात सर्व सुविधा पुरवली जाणार आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासाठी देखील याठिकाणी अस्थायी स्वरूपाचे कार्यालय बनविण्यात आले आहे. या बैठकीला देशभरातून १२ हजार पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.