‘मन की बात’: लहान मुले आणि खेळणी केंद्रस्थानी

0

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज रविवारी ३० रोजी ६८ वा ‘मन की बात’ पार पडला. यात त्यांनी संपूर्ण देशवासीयांशी संवाद साधला. आजच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’ च्या केंद्रस्थानी लहाने मुले होते. लहान मुलांची मानसिकता मजबूत करण्यावर भर देण्यात आला आहे.

लहान मुलांच्या खेळणी तयार करण्याच्या उद्योगात भारताचा वाटा कमी आहे. तो वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी लहान मुलांच्या खेळण्यांचे उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न देशातील नवीन उद्योजकांनी करावे, खेळणी तयार करण्याचे उद्योग सुरु करावे, त्यातून आत्मनिर्भरच्या दृष्टीने पाऊल टाकता येईल. नवीन स्वदेशी खेळणी तयार करून देशाला आत्मनिर्भर करण्याचे आवाहन मोदींनी केले. खेळणी तयार करतांना पर्यावरणाची देखील काळजी घेतली गेली पाहिजे असे आवाहनही मोदींनी केले.

आज सुरु केलेला स्टार्टअप भविष्यातील मोठे उद्योग होणार आहे हे नेहमी लक्षात ठेवा असा कानमंत्रही मोदींनी दिला.