‘मन की बात’: शेती जेवढी आधुनिक होईल तेवढीच फुलेल

0

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवारी २७ रोजी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील जनतेची संवाद साधत आहेत. आजच्या ‘मन की बात’मध्ये कृषी क्षेत्रावर मोदींनी अधिक भर दिला आहे. कृषीसह देशातील विविध मुद्द्यांवर मोदींनी भाष्य केले. कोरोनाच्या काळात सर्वच क्षेत्र संकटात सापडले आहे. सर्वांनाच आर्थिक फटका बसला आहे, मात्र कृषी हे एकमेव क्षेत्र असे आहे ज्याचा जीडीपी कायम राहिला आहे. संकट काळात कृषी क्षेत्राने आपली ताकद दाखवली आहे, हे क्षेत्र अधिक मजबूत व्हायला हवे. शेतीला जेवढी आधुनिकतेची जोड मिळेल तेवढीच शेती अधिक फुलेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले.

कोरोना काळात स्वत:ची आणि कुटुंबियांची अधिक काळजी घ्या. जोवर यावर औषध उपलब्ध होत नाही, तोवर कसल्याही प्रकारचा निष्काळजी करू नका असे आवाहन मोदींनी केले. मोदींनी ‘दो गज दुरी बहुत जरुरी’ हा संदेश पुन्हा देशाला दिला आहे.

‘मन की बात’मध्ये मोदींनी राष्ट्रपिता महात्मा गांधी, शहीद भगतसिंह, लाल बहाद्दू शास्त्र, जय प्रकाश नारायन, नानाजी देशमूख, राजमाता विजया राजे सिंधिया यांची आठवण ताजी केली.