VIDEO: रशियात भारताप्रती नेहमीच प्रेम-आदर दिसतो: मोदी

0

व्लादिवोस्तोक: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या रशिया दौऱ्यावर आहेत. आज ५ व्या ईस्टर्न इकॉनॉमिक फोरमला मोदींनी हजेरी लावली. यावेळी त्यांच्यासोबत रशियाचे राष्ट्रपती पुतीन देखील उपस्थित होते. यावेळी मोदींनी जोरदार भाषण केले. ‘मी जेंव्हा जेंव्हा रशियाला आलो आहे, त्यावेळी मला रशियात भारताप्रती प्रेम-आदर भाव दिसून आले आहे. दोघांची मैत्री जगासमोर एक आदर्श आहे आणि राहील’ असे मोदींनी यावेळी सांगितले. मी ज्यावेळी रशियाला आलो आहे, त्यावेळी राष्ट्रपती पुतीन यांनी मला पूर्ण वेळ दिले आहे. रात्री देखील आम्ही १ वाजेपर्यंत सोबत होतो. यादरम्यान दोन्ही देशाच्या प्रगतीसाठी दीर्घ चर्चा झाली असल्याचा उल्लेख मोदी यांनी भाषणात केला.