दहशतवादाविरोधात एकत्र येण्याची गरज; मोदींचे बिश्केक परिषदेत भाषण

0

बिश्केक: पंतप्रधान नरेंद्र मोदी कझाकस्तानमधील बिस्केक येथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय शांघाई कॉरपोरेशन ऑरगनाईझेशन अर्थात एससीओच्या शिखर परिषदेत सहभागी झाले आहे. या ठिकाणी त्यांचे आज भाषण झाले. यावेळी मोदींनी आतरराष्ट्रीय मुद्द्यावर भारत नेहमी एससीओसोबत सकारात्मक योगदान देईल असे आश्वासन दिले. एससीओच्या उपक्रमात भारताचा नेहमी सहभाग असेल असेही मोदींनी यावेळी सांगितले. दोन वर्षापूर्वी भारत एससीओचा कायमस्वरूपी सदस्य बनला आहे.

आजच्या घडीला दहशतवाद ही मोठी समस्या बनली असून दहशतवादाविरोधात सर्व मानवतावादी शक्तींनी एकत्र येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मोदी यांनी परिषदेत केले. यावेळी मोदींनी पाकिस्तानचे नाव न घेता त्यांना टोला हाणला.