मोदी-पुतीन भेट: जहाज बांधणीतील सहकार्य मजबूत करण्यावर चर्चा

0

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोडी रशियाच्या दौऱ्यावर आहेत. आज मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांची भेट झाली. मोदी आणि पुतीन यांनी एका जहाजातून एकत्र प्रवास केला. व्लादिवोस्तोकच्या झेव्हेदा या जहाजावर मोदी-पुतीन यांनी प्रवास केला. यावेळी दोघांमध्ये भारत आणि रशियामध्ये असलेल्या जहाज बांधणीतील सहकार्य अधिक मजबूत करण्यावर चर्चा झाली. जहाजातून प्रवास करण्यापूर्वी पुतीन यांनी मोदींना व्लादिवोस्तोकच्या झेव्हेदा या जहाजा विषयी माहिती दिली. जहाजाची बांधणी कशाप्रकारे करण्यात आली आहे, याबाबत मोदींना माहिती देण्यात आली.