शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार- मोदी

0

नवी दिल्ली- शेतकरी अनेक अडीअडचणीचा सामना करून उत्पादन घेतो. नैसर्गिक, अनैसर्गिक गोष्टींचा फटका शेतकऱ्यांना बसतो. याही परिस्थितीत शेतकरी उत्पादन घेतो मात्र हाती काहीही येत नाही. यासाठी आगामी काळात २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होईल यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. ते आज देशातील शेतकऱ्यांशी संवाद साधत आहे. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी सरकार करत असलेल्या कामकाजाची माहिती दिली.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची जेंव्हा मी कल्पना मांडली तेंव्हा अनेकांनी याची खिल्ली उडविली. हे कसे शक्य आहे? असे होईल का? असे प्रश्न केले गेले. मात्र सरकार सकारात्मक असून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल यात शंका नाही असा विश्वासही पंतप्रधान यांनी व्यक्त केला आहे.

४८ महिन्यात २८० मिलियन टन खाद्यान्न निर्मिती
मागील सरकारच्या काळात कृषी क्षेत्रासाठी बजेटमध्ये केवळ १ लाख २१ हजार कोटींचा बजेट असायचा या सरकारच्या काळात त्यात दुप्पट वाढ करण्यात आली असून यावर्षीच्या बजेटमध्ये २ लाख १२ हजार कोटींची तरतूद कृषी क्षेत्रासाठी करण्यात आली आहे. ४८ महिन्यात कृषी क्षेत्रात अभूतपूर्व बदल झाले. २०१० ते २०१४ या काळात २५० मिलियन खाद्यान्न उत्पादन होत होते. या सरकारच्या ४८ महिन्याच्या काळात २८० मिलियन टन खाद्यान्न उत्पादन झाले आहे.