मोदींचा उमेदवारी अर्ज दाखल !

0

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक २०१९ साठी उमेदवारी अर्ज दाखल केला. ११.३० वाजता त्यांनी अर्ज दाखल केला. पंतप्रधान मोदींनी हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वाराणसीच्या पंडितांनी शुभ मुहूर्त काढला होता. यानुसार, दिवस, तारीख आणि वेळ निश्चित करण्यात आली. कार्य सिद्धिस नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभ ‘अभिजीत मुहूर्ता’वर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी देशभरातील महायुतीचे नेते उपस्थित आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील याठिकाणी उपस्थित होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उद्धव ठाकरे यांना फोनवरून वाराणसीत उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले होते.