पहा मोदींच्या फिटनेस व्हिडिओची कशाप्रकारे उडविली जात आहे खिल्ली

0

मुंबई : बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विराट कोहलीने दिलेले चॅलेंज पूर्ण करत एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत ते योगा करताना दिसत आहेत. या व्हिडिओवर सोशल मीडियातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काही जणांनी पंतप्रधान मोदींचे हे फिटनेस चॅलेंज उचलून धरले आहे. तर काही जणांनी मात्र, मोदींच्या या व्हिडिओची नुसती खिल्ली उडविली आहे. मोदींची खिल्ली उडविणारे विविध व्हिडिओ, फोटो आणि ट्विटस् सोशल मीडियावर शेअर केले जात आहे.