बंगळुरू- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यावर केल्या जाणाऱ्या खर्चाची माहिती समोर आली आहे. गेल्या ४८ महिन्यात पंतप्रधानांनी ४१ परदेश दौरे केले आहेत. तर चार वर्षात ५२ देशांना त्यांनी भेटी दिल्या आहेत. त्यासाठी एकूण ३५५ कोटी रूपये खर्च करण्यात आल्याची माहिती, पंतप्रधान कार्यालयाने दिली. माहिती अधिकारांतर्गत ही माहिती मागविण्यात आली.
माहिती अधिकार कार्यकर्ते भिमाप्पा गाडाड यांनी पंतप्रधानांच्या परदेश तसेच देशांतर्गत दौऱ्याची माहिती मागविली होती. पंतप्रधान कार्यालयाने केवळ परदेश दौऱ्याची माहिती दिली आहे. सुरक्षेचे कारण पुढे करत देशांतर्गत दौऱ्यांवर करण्यात येणाऱ्या खर्चाची माहिती देण्यास नकार दिला. पंतप्रधानांच्या दौऱ्यातून देशाच्या वाट्याला काय आले याची माहिती सरकारने सादर करावी, अशी मागणी गाडाड यांनी केली आहे.