पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच दिवसांच्या दौऱ्यावर रवाना

0

जाकार्ता :- पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून पाच दिवसांच्या दौऱ्यावर जात आहे. या पाच दिवसाच्या दौऱ्यामध्ये इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूरला पंतप्रधान भेट देणार आहेत. इंडोनेशिया दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सागरी सहाय्य, व्यापार आणि गुंतवणुकीसंदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्याची शक्यता आहे

पहिल्यांदरच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इंडोनेशिया दौऱ्यावर जात आहे तर सिंगापूर हा त्यांचा दुसरा दौरा आहे. आज मंगळवारी संध्याकाळी त्यांचे जाकार्ता येथे आगमन होईल. हा दौरा तीन दिवसांचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या भेटीत इंडोनेशियातील भारतीय समुदायालाही भेटून संबोधित करतील.

दौऱ्यापूर्वीच मोदी म्हणाले होते की, भारताचे इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर यांच्याशी चांगले संबंध आहेत. सिंगापूरमध्ये वार्षिक सुरक्षा परिषद 1 जून रोजी शांगरी ला वार्तालाप येथे होणार असून या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहून संबोधित करतील. पंतप्रधान म्हणाले की, पहिल्यांदरच भारतीय पंतप्रधान या वार्षिक सुरक्षा परिषदेस संबोधित करतील. यावेळी प्रादेशिक सुरक्षेच्या मुद्यांवर भारताला आपली मते व्यक्त करण्याची संधी प्राप्त होईल.

पंतप्रधान मोदी यांच आज संध्याकाळी इंडोनेशियात आगमन होईल. फेसबुक पेजवर दिलेल्या निवेदनात पंतप्रधानांनी सांगितले की, ते इंडोनेशियाच्या अध्यक्ष जोको विडोडो यांच्या निमंत्रणावरून जकार्तामध्ये असतील. ते म्हणाले, ‘इंडोनेशियात पंतप्रधान म्हणून ही माझी पहिली भेट आहे. 30 मे रोजी राष्ट्रपती विदोडो यांच्यासमवेत चर्चा होईल. त्याचवेळी, आम्ही भारत-इंडोनेशिया सीईओ फोरमशी संयुक्त संवाद साधू. पंतप्रधान इंडोनेशियातल्या भारतीय समुदायातील लोकांशी चर्चा करतील आणि त्यांना संबोधित करतील.