BREAKING: कलम ३७० हटल्याने नव्या युगाची सुरुवात: पंतप्रधान मोदी

0

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीर राज्याला विशेषाधिकार देणारे कलम ३७० रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतले आहे. हा निर्णय घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच आज देशाच्या नागरिकांशी संवाद साधत आहे. मोदी काय बोलणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. यावेळी बोलताना मोदी यांनी कलम ३७० रद्द झाल्याने देशाची नवीन युगाकडे वाटचाल सुरु झाल्याचे सांगितले. आजपर्यंत जम्मू-काश्मीर आणि लद्दाकचे नागरिक त्यांच्या हक्कापासून वंचित राहिले. त्यांचे हक्क आणि अधिकार ३७० हटविण्यात आल्याने मिळणार आहे. यापुढे जम्मू-काश्मीर आणि लद्दाकच्या नागरिकांचे वर्तमान आणि भविष्य सुरक्षित झाले आहे असे मोदी यांनी सांगितले.

३७० कलम रद्द झाल्याने एकसंघ भारताचे सरदार वल्लभभाई पटेल, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, शामा प्रसाद मुखर्जी, अटल बिहारी वाजपेयी यांचे स्वप्न पूर्ण झाले असल्याचे मोदींनी सांगितले. हे कलम रद्द झाल्याने संपूर्ण देशाला असलेले अधिकार आता जम्मू-काश्मीर आणि लद्दाकचे नागरिक लाभ घेणार आहे.

३७० ने फक्त भ्रष्ट्राचार वाढविले
यापूर्वीच्या सरकारने काही गोष्टी ह्या कायम राहतील त्यात कधीही बदल होणार नाही अशी समज निर्माण करून ठेवली होती. त्यातलीच एक समज कलम ३७० होते. हे कलम कधीही रद्द होणार नाही अशी समज पसरविण्यात आलेली होती. मात्र आमच्या सरकारने ही समज नष्ट करून कलम ३७० रद्द करून संपूर्ण भारत एकसंघ केले. आजपर्यंत कलम ३७० आणि ३५-अ ने देशाला काय दिले? हे कोणालाही सांगता येत नाही. आतंकवाद, परिवारवाद आणि भ्रष्ट्राचाराशिवाय ३७० आणि ३५-अ ने काहीही दिले नाही असे म्हणत मोदींनी कॉंग्रेसला टोला लगावला.

पाकिस्तानकडून ३७०चा वापर शस्त्रासारखा
३७० कलमामुळे जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद, फुटीरतावाद, घराणेशाही आणि भ्रष्टाचाराला खतपाणीच घातल्या गेले, असे सांगतानाच जम्मू-काश्मीरमधील तरुणांची माथी भडकावण्यासाठीच पाकिस्तानने ३७० कलमाचा शस्त्रासारखा वापर केल्याचा घणाघाती हल्ला मोदींनी केला. 

लवकरच शासकीय नोकर भरती
जम्मू-काश्मीर आणि लद्दाकला आता स्वतंत्र केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. लवकरच या प्रदेशातील शासकीय नोकरभरती सुरु केली जाईल त्यामुळे या प्रदेशातील तरुणांना रोजगार मिळणार आहे.