पॅरीस: पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. आज ते फ्रांसमध्ये आहेत. आता ते पॅरीसमध्ये भारतीय नागरिकांशी संवाद साधत आहे. आमच्या सरकारने अनेक धडाकेबाज निर्णय घेतले आहे. त्यामुळे भारतातील घराणेशाही आणि भ्रष्ट्राचार कमी झाला आहे असे मोदींनी यावेळी सांगितले. पाच वर्षात भारतात सकारात्मक बदल झाले आहे. ते सगळ्यांना दिसत आहे असे म्हणत भारतातील गरिबी कमी होत असल्याचा दावा मोदींनी केला आहे.
माझ्या सरकारने पाच वर्षात अनेक निर्णय घेतले. आता दुसऱ्यांदा सत्तेत येऊन ७५ दिवस झाले आहे. त्यात अनेक नवीन निर्णय घेण्यात आले. ट्रिपल तलाक सारख्या प्रथांना बंदी घालण्यात आले आहे. त्यामुळे नव्या भारतात मुस्लीम महिलांना सन्मान मिळाल्याचे मोदींनी सांगितले.
भारत आणि फ्रांस नेहमी एकमेकांच्या मदतीसाठी सज्ज असतात. दोन्ही देश खांद्याला खांदा लावून शत्रूंशी लढले आहे. दोन्ही देशाची प्रगती उत्तरोत्तर होत राहावी यासाठी प्रयत्न सुरु आहे ते कायम राहील असे मोदींनी यावेळी सांगितले.
भारतातील जनतेने मतदान केल्यामुळे ६० वर्षात झाले नाही त्यापेक्षा अधिक काम ५ वर्षात झाले. या सरकारमध्ये जनतेच्या पैशांची लुट होत नाही. चांद्रयान -2 चा देखील मोदींनी यावेळी उल्लेख केला. काही दिवसात चांद्रयान चंद्रावर उतरणार आहे. त्यानंतर भारत चंद्रावर यान पाठविणारा जगातील चौथा देश बनणार आहे असे सांगितले.