नवी दिल्ली: हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांची जयंती ही राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरी केली जाते. त्याचेच औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुरुवारी २९ रोजी ‘मिशन फिट इंडिया’ची घोषणा केली. नवी दिल्लीत येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर मोदींनी फिट इंडिया मोहिमेचे महत्त्व समजावून सांगत आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले. स्वस्थ व्यक्ती, स्वस्थ परिवार आणि स्वस्थ समाज हे नवीन भाताच्या निर्मितीसाठी आवश्यक असल्याचे मोदींनी सांगितले.
यावेळी मोदींनी व्यक्ती अधिकाधिक व्यस्त होत चालला असल्याने स्वास्थकडे लक्ष देत नाही त्यामुळे रोग बळावत असल्याचे सांगितले. दररोज काही तास स्वत:च्या आरोग्यासाठी राखीव ठेवले पाहिजे असेही मोदींनी यावेळी सांगितले.