‘मन की बात’ मधून मोदींनी या विषयावर साधला संवाद

0

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशवासीयांशी विविध विषयवार संवाद साधला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंतप्रधानांनी पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्त केली. तर चंद्रपूरच्या आदिवासी विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट शिखर सर केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. आज प्रसारीत होत असलेला ‘मन की बात’ कार्यक्रमाचा ४४ वा भाग होता.

*मन की बातच्या माध्यमातून पंतप्रधानांनी मुस्लीम समाज बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

डी. प्रकाश राव या चहाविक्रेत्याचा पंतप्रधानांनी आपल्या मन की बातमध्ये उल्लेख केला. डी. प्रकाश यांनी ५० विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारले आहे.


 

सध्या देशात फिटनेस इंडिया मोहिम जोरात सुरु आहे. यामुळे देशात नवचैतन्य निर्माण झाले असल्याचे उल्लेख मोदींनी यावेळी केले.

दरम्यान मोदींनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहलाल नेहरु यांचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले. स्वातंत्र्यवीर सावरकर शस्त्र आणि शास्त्राचे उपासक, ओजस्वी कवी आणि समाजसुधारक सावरकर सामाजिक सुधारणेंचे प्रणेते होते असे मोदींनी यावेळी सांगितले.

पर्यावरण संतुलनासाठी नागरिकांचा पुढाकार महत्वाचा आहे. जागतिक पर्यावरण संतुलनात भारताची भूमिका निर्णायक ठरणार आहे. विक्रमी वृक्षारोपणाचा ध्यास जनतेने घ्यावा असे आवाहनही मोदींनी यावेळी केले.

केंद्रातील सत्ताधारी एनडीए सरकारला ४ वर्षे नुकतीच पूर्ण झाली आहेत. आज प्रसारित होत असलेल्या कार्यक्रमात विकासकामांचा आढावा, ‘मिशन फिटनेस’, विविध परिक्षांचे निकाल आदि मुद्द्यांवर पंतप्रधान भाष्य करण्याची शक्यता आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या यू-ट्युब चॅनेलवरून तसेच दूरदर्शन वरून थेट प्रक्षेपण केले जाणार आहेत.