वाढदिवसाला मोदींनी घेतला आईंचा आशीर्वाद !

0

गांधीनगर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ६९ वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम होत आहे. स्वत: पंतप्रधान मोदींनी सकाळी सरदार सरोवराची पाहणी करत जनसभेला संबोधित केले. त्यानंतर मोदींनी त्यांच्या आई हिराबेन यांची भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर मोदींनी आई सोबत जेवण घेतले. व्यस्त वेळेतुन मोदींनी आईसोबत वेळ घालवीत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.