मोदींना अजूनही आठवते नंदुरबारमधील चौधरी चाय; शिर्डीत सांगितले अनुभव

0

अहमदनगर- आज पंतप्रधान नरेंद्र मोदी समाधी शताब्दी महोत्सव समारोप आणि पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घराची चाबी देण्यासाठी होत असलेल्या कार्यक्रमासाठी शिर्डीत आले आहे. शिर्डीतील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाभार्थ्यांशी मराठीतून संवाद साधला आहे. यावेळी लाभार्थ्यांनी मोदींना नंदूरबारला येण्याचे निमंत्रण दिले आहे. मोदींनी यावेळी त्यांची नंदूरबारमधील चौधरी चायची आठवण सांगितली.