नवी दिल्ली :- रविवारी 43व्या ‘मन की बात’द्वारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियात झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल कौतुक केले आहे. देशातील प्रत्येक नागरिकाच्या अपेक्षेला पुरेशी अशी कामगिरी भारतीय खेळाडूंनी केली. प्रत्येक भारतीयाला याचा अभिमान आहे, असे गौरोद्गार काढले.दरम्यान पंतप्रधानांनी मनिका बत्रासह अनेक खेळाडुंचे संदेश ऐकवले तसेच सर्वांना शुभेच्छाही दिल्या. तसेच लोकांनी फिट इंडिया कार्यक्रमात सहभागी होण्याचे आव्हानही त्यांनी यावेळी केले.
भारताने अपेक्षेनुसार कामगिरी करत 26 सुवर्ण पदकांसह 66 पदके जिंकली. खेळाडूच नव्हे संपूर्ण देशासाठी ही अभिमानाची बाब आहे. जेव्हा खेळाडू पदक जिंकल्यानंतर तिरंगा खांद्यावर घेऊन उभे असतात, आणि राष्ट्रगीत वाजत असते तेव्हा प्रत्येकाला अभिमानाची जाणीव होते. मोदींनी यादरम्यान कॉमनवेल्थमध्ये मेडल जिंकणाऱ्या खेळाडुंचे संदेशही ऐकवले. यात टेबल टेनिसमध्ये पदक जिंकणारी मनिका बत्रा म्हणाली, आम्ही खूप सराव केला. त्याचा रिझल्य स्पर्धेत दिसला. तर वेटलिफ्टिंगमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी मीराबाई चानू म्हणाली, मी देशासाठी पहिले पदक जिंकले याचा मोठा आनंद जाला. मणिपूरच नव्हे संपूर्ण देशाचे नाव मोठे केले. मोदी म्हणाले, यावेळी कॉमनवेल्थ गेम्समध्ये वेटलिफ्टिंग, शूटिंग, बॉक्सिंगमध्ये खेळाडुंची कमाल केली. महिला बॅडमिंटनच्या फायनलमध्ये तर दोन्ही खेळाडू भारताच्या होत्या. कोण जिंकणार हे देशाला पाहायचे होते. सर्वांनी पाहिले आणि मलाही ते पाहून चांगले वाटले.
Yoga is a wonderful way to remain fit. Let us think about ways to make the #4thYogaDay memorable. #MannKiBaat pic.twitter.com/TMswxIFY4t
— PMO India (@PMOIndia) April 29, 2018