एक बहुमूल्य मित्र गमविला: मोदी

0

नवी दिल्ली: देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे पहिल्या फळीतील नेते अरुण जेटली यांचे आज निधन झाले. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचे श्वास घेतले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटरवरून अरुण जेटली यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अरुण जेटली यांच्या रूपाने एक बहुमूल्य मित्र गमविला आहे. या मित्राला मी अनेक वर्षापासून ओळखत होतो, त्यांच्याबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली यातच मी धन्य मानतो. या दु:खात मी जेटली यांच्या कुटुंबीयांसोबत असल्याचे मोडी यांनी सांगितले आहे.

मोदी आज विदेश दौऱ्यावर आहेत. ते लवकरच भारतात परत येतील असे बोलले जात होते.