ग्रामीण भागातील लोकांना तंत्रज्ञानाचा अधिक उपयोग व्हावा-मोदी

0

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी डिजीटल इंडियाच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. “तंत्रज्ञानाचा उपयोग सर्व लोकांना व्हावा, विशेषत: ग्रामीण भागातील लोकांना त्यातून आनंद मिळावा, यासाठी डिजीटल इंडिया मोहीम सुरू केली, असे मोदी यांनी सांगितले.

कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएसएस) जे भारतातील विविध इलेक्ट्रॉनिक सेवा वितरणासाठी ऍक्सेस पॉईंट म्हणून काम करतात, त्यामुळे रोजगाराच्या नवीन संधी नागरिकांना मिळाल्या आहेत, असे मोदी म्हणाले. तंत्रज्ञानामुळे रेल्वेची तिकिटे ऑनलाईन बुक केली जाऊ शकतात, बिले ऑनलाइन भरता येतात. तंत्रज्ञानाचे फायदे काही निवडक लोकांसाठी मर्यादित नाहीत, परंतु समाजाच्या सर्व स्तरातील लोकांसाठी आहेत. केवळ हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन ही योजना सुरु केली असेही मोदी म्हणाले.