वाराणसी: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून निवडणूक लढवीत आहेत. आज त्यांचा याठिकाणी मेगा रोड शो झाला. यावेळी मोठी गर्दी पाहायला मिळाली. अक्षरश: जनसागर या ठिकाणी लोटला होता. बनारस विश्व हिंदू विद्यालयाच्या (बीएचयू) गेटवर पोहोचताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वात आधी बीएचयूचे संस्थापक पंडित मदन मोहन मालवीय यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यानंतर त्यांनी आपल्या गाडीतून रोड शोला सुरुवात केली. हा रोड शो जवळपास सात किमीपर्यंत चालला. लंका परिसरातून सुरु होणारा हा रोड शो गौदेलिया मार्गे दशाश्वमेध घाटापर्यंत गेला. उद्या ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.