अहमदनगरः साई समाधी शताब्दी सोहळ्यानिमित्त आणि पंतप्रधान आवास योजनेच्या शुभारांभासाठी शिर्डीत आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम साई समाधीचे दर्शन घेतले आणि मंत्रोच्चारांच्या गजरात पाद्यपूजन केले. साईबाबांच्या चरणी लीन झालेल्या मोदींनी मनोभावे आरतीही केली आणि समाधीवर चादर चढवली. त्यांच्यासोबत राज्यपाल चे. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.