मुंबई: नरेंद्र मोदी पार्ट २ चा अर्थसंकल्प आज संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. या अर्थसंकल्पावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी टीका करत हा बजेट गरीबांचा खिसा कापणारा आहे असे ट्वीट केले आहे.
पेट्रोल आणि डीझेल वर कर आकारून, आणि इन्कमटॅक्स मध्ये कोणतीही कमी न करणारा आज संसदेत अर्थसंकल्प सादर झाला असल्याची टीका त्यांनी केली आहे.