पोद्दार स्कूलचा १० वीचा १०० टक्के निकाल.

चाळीसगाव | सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन ( सीबीएसई ) द्वारा घेण्यात आलेल्या १० वीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी ऑनलाईन जाहीर झाला. त्यात पोद्दार इंटरनॅशनल स्कूल ने आपल्या यशाची उज्वल परंपरा राखत मानस प्रशांत चव्हाण ९७:०४ टक्के गुण मिळवून चाळीसगाव तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला.या परीक्षेत द्वितीय क्रमांक दिपश्री ढाके व खुशी पाटील ९५:०४ टक्के गुण प्राप्त केले. तिसरा क्रमांक भक्ती कोतकर व दक्ष माखिजानी ९५:०० टक्के गुण प्राप्त केले. चौथा क्रमांक भाविक कोतकर व संकेत पाटील ९४:०६ टक्के गुण प्राप्त केले. पाचवा क्रमांक सागर राठोड याने पटकावत ९३:०६ टक्के गुण प्राप्त करत यश संपादन केले.
प्रणव असमर- ९३:०४,
जयदित्य परमार – ९२: ०८,
आदित्य चव्हाण – ९२:००,
अनुष्का वाघ – ९१:०८,
मयंक कुलकर्णी – ९१:०२ वरील विद्यार्थ्यांनी देखील घवघवीत यश संपादन केले.
तसेच दिपश्री ढाके गणित व IT विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त केले. शाळेचे प्राचार्य श्री अजय घोरपडे सर, संस्थाचालक व व्यवस्थापक तसेच शाळेतील शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक करत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.