मुंबईः पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाशी शिवसेनेचे नेते मंत्री संजय राठोड यांचे नाव जोडले गेले. पुजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर गेल्या 15 दिवसांपासून अलिप्त असलेले मंत्री संजय राठोड दोन दिवसांपूर्वी प्रथमच समोर आले. संजय राठोड यांच्या समर्थनार्थ झालेल्या शक्तीप्रदर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. पोहरादेवी येथे लाखोंची गर्दी झाली होती. राज्यात गर्दी न करण्याचे आदेश असतांना गर्दी केल्याने संपूर्ण राज्यात टीका होत असतांना आता पोहरादेवी ट्रस्टचे अध्यक्ष महंत कबीरदास यांच्यासह १९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. महंत कबीरदास यांच्या घरातील पाच ते सहा सदस्यांना ही कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
संजय राठोड यांच्या समर्थनार्थ झालेल्या गर्दीवरून शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.