पुणे : “नांदेडमधील पोलिस भरती घोटाळ्याचा आरोपी प्रवीण भटकरला पकडून त्याला कठोर शिक्षा करा,” असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी सांगितले आहे. प्रवीण भटकर हा नांदेडच्या पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार असल्याचा आरोप आहे. प्रवीण भाटकर हा शास्त्रज्ञ विजय भटकर यांच्या चुलत भावाचा मुलगा आहे. त्याने ओएमआर नावाची स्वतंत्र कंपनी स्थापन केली.
या कंपनीमार्फत तो डाटा जमा करायचा आणि त्याचा वापर भरतीमध्ये घोटाळा करण्यासाठी करायचा, असा त्यांच्यावर आरोप आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे भटकरच्या फसवणुकीचं जाळं संपूर्ण राज्यभरात पसरलेलं आहे. प्रवीण भटकर हा डॉक्टर विजय भटकर यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या ईटीएच कंपनीत प्रवीण भटकर काम करायचा. नांदेडसह राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये पोलिस भरतीत घोटाळा झाल्याचं उघडकीस आलं आहे. या प्रकरणी दोघा पोलिसांसह 20 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस भरती प्रक्रियेमध्ये उत्तर पत्रिकांच्या तपासणीचं कंत्राट एसएसजी कंपनीकडे होतं. या कंपनीच्या मदतीनेच भरती घोटाळा करण्यात आल्याचं उघड झालं आहे. नांदेडसह अन्य चार जिल्ह्यांतील पोलिस भरतीच्या उत्तरपत्रिका तपासणीचं काम होतं. दोन पोलिस कर्मचारी, एसएसजीचे दोन कर्मचारी यांच्यासह एकूण 20 आरोपींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 20 पैकी 12 आरोपी नांदेड पोलिसांच्या ताब्यात आहेत.