भुसावळ प्रतिनिधी l
जळगांव येथील एमआयडीसी पोलीस स्टेशनला माहीती मिळाली होती की, मास्टर कॉलनी, कुरेशी मोहल्ला, पिरजादे वाडा, अक्सा नगर मेहरुण जळगाव भागात दिनांक २५/०६/२०२३ रोजी काही चोरीची जनावरे वाहनात अवैधपणे कोंबुन त्यांची कत्तली साठी वाहतुक करुन घेवुन जात आहे तसेच अवैध जनावरांची कत्तल करत आहे बाबतची माहीती मिळाल्याने सकाळी मास्टर कॉलनी, मेहरुण जळगाव येथे मोहीम राबवुन लेलँड वाहन क्र. एम. एच १९ सीवाय २३३०, छोटा हत्ती वाहन क्र. एम.एच ४७ ई ३०१४, महींद्रो बोलेरो पिकअप वाहन क्र. एमएच १९ सीवाय ३२३९ असे वाहन मास्टर कॉलनी कडे जात असतांना पकडण्यात आले होते. सदर वाहनात चोरुन कत्तली करीता व निर्दयतेने वाहतुक करीत असतांना एकुण १९४,०००/- रुपये किंमतीचे १५ नग बैल (गोवंश) पकडण्यात आले होते. सदरची वाहतुक ही शेख राजीक शेख रफिक सोबत असलेला, शेख रेहान शेख युसूफ कुरेशी वरणगांव जि जळगाव,अदनान कय्युम खान रा दत्तनगर मेहरुण जळगाव, त्याचे सोबत असलेले, ईफतेखार शरीफ खान रा मास्टर कॉलनी जळगाव, सरफराज रहीम शेख रा, मास्टर कॉलनी जळगाव, सैय्यद वाजीद सैय्यद इब्राहीम रा रथ चौक, जुने जळगाव व त्याचे सोबत, सैय्यद अनीस सैय्यद हमीद मन्यार मन्यार मोहल्ला मेहरुण जळगाव, हे करीत असतांना मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन गुन्हा दाखल करण्यात आला होता व त्यांना अटक करण्यात आली होती. व तसेच दुस-या कारवाई मध्ये अक्सा नगर मेहरुण जळगाव येथे पत्र्याचे शेड मध्ये असरार शेख मुक्तार शेख, व त्याचा अल्पवयीन भाऊ व इफतेकर शेख व सत्तार शेख असे रा. अक्सा नगर, मास्टर कॉलनी मेहरुण जळगाव असे महाराष्ट्र राज्यात बैल (गोवंश) कत्तल करण्यात प्रतिबंध असतांना सुध्दा कत्तल करतांना मिळुन आले होते तसेच सदर कत्तल खाण्याजवळ ३१०,०००/- रुपये किंमतीचे ४० बैल (गोवंश) कोठुन तरी चोरी केलेले मिळुन आलेले होते. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असुन असरार शेख मुक्तार शेख यास अटक करण्यात आलेली आहे…
सदर एकुण केलेल्या कारवाई मधे ५०४,०००/- रुपये किंमतीचे ५५ नग बेल (गोवंश) तसेच गुन्हयात वापरलेले १०,०००,००/- रुपये किंमतीचे ०३ वाहने जप्त करण्यात आलेले आहे. व संशयित आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सदरचे कारवाई ही पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोउनी दत्तात्रय पोटे, सफै. अतुल वंजारी, पोहेकॉ प्रदीप पाटील, रामकृष्ण पाटील, राजेंद्र कांडेलकर, दिपक चौधरी, पोना, सचीन पाटील, योगेश बारी, ईमरान सेव्यद, किशोर पाटील, किरण पाटील, मंदार पाटील, चेतन पाटील, महोला पोलीस अंमलदार, आशा पांचाळ यांनी कारवाई केली आहे. सदर गुन्हयाचा तपास पोउनी दत्तात्रय पोटे हे करीत आहेत.