जिल्हा पोलीस दल, पिपल्स पीस फाऊंडेशन व त्रिमुर्ती फाऊंडेशनचा संयुक्त उपक्रम ; दोषसिध्दीसह गुन्हेगारांना शिक्षा मिळविण्यात उत्कृष्ट कामगिरी करणार्या 150 जणांचा सन्मान
जळगाव – समाजातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी प्रत्येक गुन्ह्यात गुन्हेगारांना कठोरात शिक्षा होणे गरजेचे असते, त्याचा समाजावर परिणाम पडतो. अशाच प्रकारे दोषसिध्दीसह गुन्हेगाराला शिक्षा होण्यासाठी महत्वाची कामगिरी बजावणार्या पोलीस अधिकारी, कर्मचारी, जिल्हा सरकारी वकील, सहाय्यक सरकारी वकील, साक्षीदार व पैरवी अधिकारी अशा एकूण जिल्ह्यातील 150 जणांना रविवारी सन्मानित करण्यात आले. जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अशाप्रकारचा सन्मान झाल्याने व त्यातच जिल्हा व प्रमुख सत्र न्यायाधीश गोविंद सानप यांच्या हस्ते मिळालेल्या पुरस्काराने पैरवी अधिकार्यांसह , साक्षीदार पोलीस कर्मचारी, अधिकारी तसेच सहाय्यक सरकारी वकील भारावले होते. स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
जिल्हा पोलीस दल, पिपल्स पिस फाऊंडेशन व त्रिमुर्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात कार्यसन्मान सोहळा पार पडला. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा व प्रमुख सत्र न्यायाधीश गोविंद सानप होते. तर व्यासपीठावर अपर पोलीस अधीक्षक लोहीत मतानी, पिपल्स पिस फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा तथा अपर पोलीस अधीक्षक लोहीत मतानी यांच्या पत्ी मनजीत कौर मतानी, त्रिमुर्ती फाऊंडेशनचे मनोज पाटील, मनजीत कौर यांच्या आजी शकुंतला मग्गो कौर, आई अमरजीत कौर, बहिण अनिशा अरोरा यांची उपस्थिती होती. मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. यानंतर न्या. गोविंद सानप यांच्या हस्ते तपास अधिकारी म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावलेले पोलीस निरिक्षक, सहाय्यक पोलीस निरिक्षक , त्यांचे राईटर सहाय्यक फौजदार, यांच्यासह गुन्ह्यात महत्वपूर्ण ठरलेले म्हणजे साक्षीदार यात पोलीस पाटील, नागरिक तसेच पैरवी अधिकारी यांना स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. सूत्रसंचालन स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार मिलिंद केदार यांनी तर आभार पोलीस उपविभागीय अधिकारी गजानन राठोड यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर सत्कारार्थींसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची उपस्थिती होती. यशस्वितेसाठी लोहित मतानी अप्पर पुलिस अधिक्षक जळगाव, सचिन बागुल, पंकज दारा, अजय पाटील, चंदा भालेराव, रफीक शेख, किरण भोई, जळगाव पुलिस दल, पीपल्स पीस फाउंडेशन, त्रिमुत्री फॉउंडेशनच्या टीम ने परिश्रम घेतले. यावेळी पिपल्स पीस फाऊंडेशन पदाधिकारी, सदस्यांसह या कार्यसन्मान सोहळ्यासाठी अहारोत्र परिश्रम घेणार्या फाऊंडेशनच्या सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन बागुल यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
सन्मान करण्याची संधी मिळाल्याचा अभिमान
एक आयपीएस पोलीस अधिकार्याची पत्नी म्हणून पोलिसांच आयुष्य जवळून बघितले असून अनुभवत आहे. पोलीस कर्मचार्याला सांभाळणार्या कुटुंबांला माझा सलाम आहे. पती लोहीत मतानी याच्या सहकार्याने पिपल्स पिस फाऊंडेशन उभारुन समाजसेवेची उभारी मिळाली आहे. 24 तास ड्युटी अशा पोलीस कर्मचार्यांसह गुन्हेगारांना शिक्षा व्हावी, यासाठी काम करणार्या शेवटच्या घटकापर्यंत प्रत्येकाची जबाबदारी असलेल्या सहाय्यक सरकारी वकील, पैरवी अधिकारी, साक्षीदार यांचा सोहळ्याच्या माध्यमातून मला सर्वांचा सन्मान करण्याची संधी मिळाली, त्याचा मला अभिमान असल्याचे मनजीत कौर यांनी मनोगतातून सांगितले. तसेच गुन्हेगारी कमी होण्यासाठी प्रत्येकाला रोजगार मिळावा, यासाठी फाऊंडेशन प्रयत्नशील आहे. तसेच पुढील काळात वेश्या व्यवसाय करणार्या महिलांसाठी विशेष कार्य करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिक्षेचा दर 50 टक्क्यांपर्यंत घेवून जाणार
तपासधिकार्याने गुन्ह्याच्या तपासात तन मन धनाने सामील व्हा, केसचा निकाल जेवढा काळात अपेक्षित करतो, तेवढ्याच काळात लागू द्या, आज प्रत्येकाने काहीतरी जबाबदारी स्विकारली पाहिजे. पोलीस दलाकडून, जिल्हा सरकारी वकील, सरकारी वकिल यांच्याकडून जास्तीचे सहकार्य अपेक्षित त्यामुळे जास्तीत जास्त प्रकरणांचा निपटारा होईल. दोषीसिध्दीचे प्रमाण वाढून गुन्हेगारांना कठोर शिक्षा होईल, गुन्हेगाराला शिक्षा झाल्यावर चांगला संदेश समाजात जातो, असे अध्यक्षीय मनोगतात न्या. गोविंद सानप यांनी सांगितले. त्याचप्रमाणे आधी नऊ टक्के शिक्षेचा दर आता 25 टक्के शिक्षेचा दर झाला आहे. सर्वांनी एकत्रितरित्या झोकून देवून प्रामाणिकपणे काम केल्यास पुढच्या सहा महिन्यांमध्ये शिक्षा होण्याचे प्रमाणे 50 टक्के असेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. तपासधिकार्यांच्या तपासातील तसेच दोषारोपत्रातील त्रृटीवर प्रकार टाकला व त्या होवू नयेत म्हणून त्यामुळे दोषारोपपत्र दाखल करणेपासून ते निकाल लागेपर्यंतच्या कागदपत्रांसह तपासी अंमलदाराच्या सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी व त्रृटी कमी होवून दोषसिध्दीचे प्रमाण वाढण्यासाठी एक जबाबदार अधिकार्याची नेमणूक करण्याचे आवाहनही न्या. सानप यांनी यावेळी केले.
या कर्मचारी, अधिकार्यांचा झाला सन्मान
तपासीअधिकारी – पोलीस उपअधीक्षक केशव पातोंड, पो.नि. राजेंद्र माळी, कुबेर चवरे, बापू जि. रोहम, देविदास ढुमणे, दत्तात्रय पाटील, किसन नजन पाटील, पराग सोनवणे. स.पो.नि. जयवंत सातव, पी.के. सदगीर, दीपक गंधाले, व्ही. आर. आढाव, डी.के. शिरसाठ, के. एस. पावरा, सार्थक नेहेते, एस.एस. पाटील, शिवाजी नागवे, हेमंत कडुकार, आर.टी. धारबळे, जयपाल हिरे. पो.उ.नि. बी.डी. पाटील, एन. यू. दाभाडे, दिलीप विठोबा पाटील, पंकज शिंदे, एम.जी. मोरे, सुजाता राजपूत, सुनिल भाबड.
पैरवी अधिकारी – स.फौ. प्रभाकर भामरे, शालिग्राम पाटील, अशोक पाटील, धनसिंग राठोड, रियाजोद्दीन शेख, नरसिंग महारू चव्हाण, पो.हे.कॉ. राजाराम बळीराम सुरवाडे, देविदास कोळी, तुषार मिस्तरी, अनिल सपकाळे, समिना तडवी, राजेंद्र सैंदाणे.
जिल्हा सरकारी अभियोक्ता – जिल्हा सरकारी वकील केतन ढाके, सहा.सर.अभियोक्ता अॅड. काबरा, आर.बी. चौधरी, के. आर. बागुल, एस.आर. पाटील, निलेश चौधरी, प्रदीप महाजन, एस. बी. घोडंबे, व्ही. एस. महाजन, पी.व्ही. चौधरी, मोहन देशपांडे, व्ही. डी. खडसे, वाय. जी. गुजराथी, वैशाली महाजन, कोळंबे, चारुलता बोरसे, नितीन देवराज.
तपासी अंमलदार यांचे लेखानिक – पोउनि अनिस अहमद शेख, स.फौ. नरसिंग महारू चव्हाण, ताहेर गंभीर तडवी, पो.हे.कॉ. सुनिल पंडित दामोदरे, शेख इस्माईल इसा, अशोक तुकाराम साळुंके, भरत दौलत लिंगायत, मपोहेकॉ विद्या हरिलाल पाटील, राजाराम बळीराम सुरवाडे, पो.ना. वासुदेव राजधर मराठे, संदेश समाधान पाटील, संदीप रमेश पाटील, प्रदीप हिम्मत पवार, राजू महाजन, अखिल खलील मुजावर, विनोद आत्माराम श्रीनाथ, संजीव एकनाथ चौधरी, संदिप जयवंत जगताप, विजय अशोक सानप, भरत दौलत लिंगायत, वासुदेव राजधर मराठे, संदिप शांताराम महाजन, संदीप सुधीर धनगर, जयंत पुरुषोत्तम महाजन, संदेश समाधान पाटील, किरण निंबालाल धमके, दीपक देवराम चौधरी, रवींद्र लुका पवार, विश्वनाथ गायकवाड, आमिर तडवी, विष्णू लक्ष्मण भिल, अजय शांताराम पाटील.