हिमांशू रॉय यांच्या जाण्याने कर्तबगार अधिकारी गमावला-मुख्यमंत्री

0

मुंबई-राज्य आणि मुंबई पोलीस दलात अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळणारे वरिष्ठ आयपीएस अधिकारी हिमांशू रॉय यांनी मुंबईत आत्महत्या केली. या घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. आपण एका कर्तबगार पोलीस अधिकाऱ्याला मुकलो असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

पोलीस दलात विविध जबाबदाऱ्या सांभाळत असताना त्यांनी अनेक महत्त्वाच्या प्रकरणांचा छडा लावला. एक धडाडीचे पोलीस अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक होता. त्यांच्या निधनामुळे आपण एका चांगल्या अधिकाऱ्याला मुकलो आहोत. हिमांशू रॉय यांच्या कुटुंबीयांना आणि आप्तस्वकियांना हे दुःख सहन करण्याचे बळ मिळो अशी प्रार्थना मी करतो. या सगळ्यांच्या दुःखात मी सहभागी आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा शोकसंदेश ट्विट केला आहे.