मुंबई-राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि माजी एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांनी आपल्या दीर्घ आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. त्यांच्या दीर्घ आजारावर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. सह पोलीस आयुक्त म्हणून त्यांची कामगिरी वाखाणण्याजोगी होती. दोन वर्षांपूर्वी त्यांना एक आजार झाला होता. स्वतःवर गोळी झाडून त्यांनी आत्महत्या केली अशी माहिती समजते आहे.
अशी आहे कारकीर्द
हिमांशू रॉय हे १९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. २०१३ मधील आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात विंदू दारासिंहला त्यांनी अटक केली होती. तसंच, दाऊदचा भाऊ इकबाल कासकर याचा ड्रायव्हर अरिफवरील गोळीबार प्रकरण, पत्रकार जेडे हत्या प्रकरण, विजय पालांडे, लैला खान डबल मर्डर केस अशी महत्त्वाची प्रकरणं सोडविण्यात हिमांशू रॉय यांची मोठी भूमिका होती.
आदी ठिकाणी पहिले काम
१९९५ मध्ये नाशिक (ग्रामीण) पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत होते. त्यानंतर अहमदनगर पोलीस अधीक्षक म्हणून कामकाज केले. नाशिकचे आर्थिक गुन्हे विभागात पोलीस उपायुक्त पदावर कार्यरत होते. २००९ साली मुंबईत पोलीस सहआयुक्त तसेच सायबर सेलमध्येही त्यांनी काम केले आहे. त्यांनी महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. होते. सध्या ते राज्याचे महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक पदी होते.