शिमला: आज १७ व्या लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान होत आहे. दरम्यान हिमाचल प्रदेशमधील एका १०२ वर्षाच्या वृद्धाने मतदान केंद्रावर जात मतदानाचा हक्क बजावला आहे. श्याम सरण नेगी असे त्यांचे नाव आहे. त्यांनी पहिल्यांदा १९५१ च्या निवडणुकीत मतदान केले होते.
त्यांनी मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्वांनी मतदान करावे असे आवाहन केले.