प्रदूषणाच्या समस्येवरून गौतमचे केजरीवाल यांच्यावर ‘गंभीर’ आरोप

0

नवी दिल्ली : दिल्ली नागरिक सध्या प्रदूषणामुळे हैराण झाले आहेत. यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहे. दरम्यान भारतीय संघाचा क्रिकेटपटू गौतम गंभीरने या समस्येवरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य केले. गंभीरने ”केजरीवाल यांनी खोटी आश्वासने दिली. ते प्रदूषण व डेंग्युची समस्या सोडवण्यात अपयशी ठरले आहेत. केजरीवाल यांच्यामुळे या पिढीला प्रदूषणात रहावे लागत आहे.”

गंभीरने दिल्ली सरकारवर निशाणा साधताना बुधवारी एक ट्विट केले. ”दर्दे दिल, दर्दे जिगर दिल्ली में जगाया ‘आप’ने, पहले तो यहां ऑक्सिजन था, ऑक्सिजन भगाया ‘आप’ने., असे ट्विट गंभीरने केले आहे. गंभीरने या पोस्टमध्ये जामा मशीद परिसरातील एक फोटोही टाकला आहे.