मृत्यू झालेल्या घटनास्थळी पोलिसाची सेल्फी

0

लखनऊ: लखनऊ येथे एक पोलीस अधिकाऱ्याची असंवेदनशीलता समोर आली आहे. राजाजीपुर येथे गोदामात लोडरमधून सीमेंट उचलत असतांना कामगारांच्या अंगावर सिमेंटच्या गोण्या पडल्याचे दोन कामगारांचा मृत्यू झाले आहे. या घटनास्थळी पोलीस हजर झाले. दरम्यान संजय भारतीय नामक पोलीस उपनिरीक्षकाने या ठिकाणी सेल्फी काढण्यात धन्यता मानली. यामुळे संजय भारतीय यांच्या रूपाने पोलिसांमधील असंवेदनशीलता समोर आली आहे. या अपघातस्थळी स्थानिक लोकांच्या मदतीने मदत कार्य राबविण्यात आले. मदत कार्य सुरु असतांना संजय भारतीय सेल्फी काढण्यात व्यस्त होते.