सुप्रसिद्ध गायिका शिवानी भाटियाचा कार अपघातात मृत्यू !

0

यमुना-सुप्रसिद्ध पॉप गायिका शिवानी भाटिया हिचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. काल मंगळवारी रात्री यमुना एक्स्प्रेस-वे वर हा अपघात झाला. या अपघातात शिवानीचा मृत्यू झाला. तर तिचा पती निखील भाटिया या अपघातात जखमी झाला.

शिवानी पती निखील भाटियासोबत एका कार्यक्रमासाठी जात होती. यावेळी तिचा पती निखील कार चालवत होता. याचदरम्यान यमुना एक्स्प्रेस-वेवर त्यांच्या कारचा अपघात झाला. त्यांच्या भरधाव कारने एका अज्ञात वाहनाला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता कारचा अक्षरश: चुराडा झाला. अपघातानंतर शिवानी व निखील दोघांनाही जखमी अवस्थेत रूग्णालयात हलवण्यात आले. परंतू शिवानीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर निखीलवर उपचार सुरु आहेत.

शिवानी भाटिया बिहारच्या सीतामढी जिल्ह्याची रहिवासी होती. गेल्या काही वर्षांत ती पतीसोबत दिल्लीच्या लाजपतनगर येथे राहत होती. दिल्ली एनसीआर व आजूबाजूच्या भागात शिवानी कमालीची लोकप्रीय होती. महुआ टीव्हीवर प्रदर्शित होणाºया ‘सूरो का संग्राम’ कार्यक्रमात ती उपविजेती राहिली होती.