मुंबई, वृत्तसंस्था – टीव्ही व चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारे ऋतुराज सिंह यांचे कार्डिअॅक अरेस्टमुळे निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. आपल्या कसदार अभिनयामुळे ऋतुराज सिंह देशभरात लोकप्रिय होते.
सोमवारी रात्री ही दुदैवी घटना घडली. त्यांच्या निधनाने मनोरंजसृष्टीवर शोककळा पसरली. ‘अपनी बात’, ‘ज्योती’, ‘हिटलर दीदी’, ‘शपथ’, ‘वॉरियर हाय’, ‘आहट’, ‘अदालत’, ‘दिया और बाती’ अशा अनेक शोमध्ये ऋतुराज यांनी काम केलं होतं. ते रुपाली गांगुलीसह लोकप्रिय हिंदी मालिका ‘अनुपमा’मध्ये देखील झळकले होते. अभिनेते अमित बहंल यांनी ऋतुराज यांच्या निधनाच्या वृत्ताची पुष्टी केली आहे.