जळगाव आगारातील कंडक्टरची बदनामी करणारे पोस्टर्स चिकटवले
स्थानकात आगारातील सीसीटीव्ही फूटेज शनिवारी दुपारी 1 वाजेपासून चेक करण्याचे काम सुरु होते.
जळगाव | प्रतिनिधी
राज्य परिवहन मंडळाच्या जळगाव आगारातील एका कंडक्टरची बदनामी करणारा मजकुर फोटोसह बसस्थानकात तसेच शहरातील विविध थांब्यांवर चिटकावून बदनामी केल्या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी संबधित कंडाक्टरने विभागीय नियंत्रकांसह पोलिस अधिक्षकांकडे लेखी तक्रार केली आहे. तसेच बसस्थानकाच्या आवारात रात्रीतून पोस्टर चिटकावणार्याचा शोध घेण्यासाठी आगारातील सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यात येत आहेत.
जिल्ह्यातील एका बस आगारात सेवेत असलेल्या वाहकाच्या फोटोसह त्याचे नाव घेऊन चारित्र्य हनन होईल, असा मजकुर लिहून बसस्थानकातील विविध ठिकाणी तसेच खोटेनगर, दादावाडी आदी भागातील बसस्थांब्यावर महामार्ग प्राधीकरणाच्या प्रत्येक बोर्डांवर ज्या ठिकाणी हा कंडक्टर राहतो त्या अपार्टमेंट मध्ये प्रत्येक फ्लॅटवर शहरातील प्रत्येक कॉलेजतसेच सार्वजनिक ठिकाणी एक हजारावर पोस्टर चिटकावले आहेत.
हे पोस्टर चिटकवल्याची माहिती संबंधित कंडक्टरला शुक्रवारी रात्री दोन वाजता मिळाली तेव्हापासून पोस्टर शोधून ते पाडण्याचे काम सुरू असून या साठी एसटीचे काही कर्मचारी देखील हे काम करत असल्याची माहिती समोर आली. पोस्टर चिटकवणार्या संबंधित व्यक्तीने कंडक्टरला फोन करून मारण्याची धमकीत दिले तेही समजते यावरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात फोन करत्याविरुद्ध मुन्ना दाखल करण्यात आला आहे.
बसस्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले कंडाक्टरची बदनामी करणारे पोस्टर बसस्थानकात शुक्रवारी रात्रीतून लावण्यात आले आहे. हे पोस्टर कोणी लावले याचा शोध घेण्यासाठी बस स्थानकात आगारातील सीसीटीव्ही फूटेज शनिवारी दुपारी 1 वाजेपासून चेक करण्याचे काम सुरु होते.