छत्रपती संभाजी नाट्यगृहाची वीज कापली ; चूक नक्की कोणाची ?

जळगाव – शहरात मोठ्या दिमाखात उभे असलेल्या छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहाची वीज महावितरणने कापली आहे. तब्बल ८ लाख ४२ हजार ६६० रुपयांची वीज थकबाकी असल्याने महावितरणने ही कारवाई केली असल्याचे समजते.

जिल्हा प्रशासन आणि केशव स्मृती प्रतिष्ठान यांच्यातील करारानुसार  छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहाचा ताबा सध्या केशव स्मृती प्रतिष्ठानकडे आहे. दरम्यान, प्रशासन की केशव स्मृती प्रतिष्ठान यापैकी नक्की कोणाच्या चुकीमुळे ही वीज कापण्यात आली आहे. असा प्रश्न आता नाट्यकर्मी यांच्यातून  उपस्थित होत आहे.