नथुराम गोडसे सच्चे देशभक्त: साध्वी प्रज्ञासिंग

0

भोपाळ: शहीद पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजपचे भोपाळमधील उमेदवार मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोप साध्वी प्रज्ञासिंग यांनी पुन्हा नवीन वादाला तोंड फोडले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे मारेकरी नथुराम गोडसे हे देशभक्त होते, देशभक्त आहेत आणि देशभक्त राहतील असे विधान साध्वी यांनी केले आहे.

अभिनेते कमल हासन यांनी नथुराम घोडसे हे स्वतंत्र भारताचे पहिले हिंदू दहशतवादी होते असे विधान केले होते. त्यावर बोलतांना साध्वी यांनी नथुराम गोडसे हे देशभक्त होते असे विधान केले आहे. ज्यानी भगवा आतंकवाद म्हणून हिंदू धर्माला बदनाम करण्याचा षडयंत्र रचले आहे, त्यांना जनता या निवडणुकीत माफ करणार नाही असेही त्यांनी सांगितले आहे.