प्रकाश तायडे यांची कंत्राटदार संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पदी तर उपाध्यक्ष पदी संतोष तेलंग ची निवड
भुसावळ ( प्रतिनिधी ) | येथील वीज निर्मिती केंद्रातील कंत्राटदार प्रकाश तायडे यांची वंचित बहुजन कंत्राटदार संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पदी तर उपाध्यक्ष पदी संतोष तेलंग यांची निवड करण्यात आली.संघटनेचे माजी अध्यक्ष प्रकाश सरदार यांच्यासह कार्यकारणी चा कार्यकाळ पूर्ण झाल्याने वंचित बहुजन आघाडी चे अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली नुतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.अध्यक्ष पदी प्रकाश तायडे उपाध्यक्ष संतोष तेलंग सचिव उस्मान खान पठाण कोषाध्यक्ष मन्साराम कोळी सहसचिव नारायण झटके सदस्य प्रकाश सरदार तोसिफ खान पठाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली.