भाजपचे हिंदुत्व ढोंगी

0

रायचूर – कर्नाटक विधानसभा निवडणूक विकासाऐवजी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर केंद्रित होण्याची शक्यता आहे. श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी भाजप हा ढोंगी हिंदुत्ववाद्यांचा पक्ष असल्याचा आरोप केला आहे. केवळ मतांचे राजकारण करणाऱ्या भाजपला कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदान करू नये, असे आवाहन देखील मुतालिक यांनी केले.

मुतालिक यांनी रायचूर येथील पत्रकार परिषदेत भाजपवर कठोर शब्दांत हल्ला चढविला. यावेळी स्थानिक शिवसेना नेते मुतालिक यांच्यासोबत व्यासपीठावर उपस्थित होते. येत्या १२ मे रोजी कर्नाटक विधानसभेसाठी मतदान होत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीने प्रचारात रंगत वाढली आहे.

शिवसेना खरा हिंदुत्ववादी
भाजपवर ढोंगी हिंदुत्ववादी म्हणून टीका करणाऱ्या मुतालिक यांनी शिवसेनेला मात्र सॉफ्ट कॉर्नर दिला आहे. शिवसेना हा खरा हिंदुत्ववादी पक्ष असल्याचे मुतालिक यांनी म्हटले आहे. कर्नाटक विधानसभेच्या रिंगणात शिवसेना देखील उतरली असून बेळगाव वगळता अन्य ठिकाणी उमेदवार दिले आहेत.