तालुक्यातील डोंगरगाव येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेत शाळापूर्व तयारी मेळावा 2 घेण्यात आला.

शहादा : तालुक्यातील डोंगरगाव येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेत शाळापूर्व तयारी मेळावा 2 घेण्यात आला. शाळापूर्व तयारी मेळाव्याचे उदघाटन शाळा व्यवस्थापन समिती चे उपाध्यक्ष पृथ्वीराज राऊळ यांच्या हस्ते करण्यात आले

यावेळी केंद्रप्रमुख शंकर अहिरे ,मुख्याध्यापक राजेंद्र ठाकरे,बीआरसीचे विषयतज्ञ मिलिंद देसले,हेमंत पाटील ज्ञानप्रकाश फौंडेशन चे विशाल कुंभकर्ण उपस्थित होते .

शाळापूर्व तयारी अंतर्गत इयत्ता 1लीच्या विद्यार्थ्यांकडून शारीरिक व बौद्धिक विकास,सामाजिक विकास,भाषा विकास, गणित विकास यावर आधारित विविध कृती करून घेण्यात आल्यात इयत्ता 1लीच्या शिक्षिका स्वाती पाटील यांनी विध्यार्थी नोंदणी केली त्यांना यासाठी शाळेतील सहकारी शिक्षक संतोष कुवर,राजेंद्र पाटील,सलीम पिंजारी, राजेंद्र धनगर, विजया बोरसे,आशालता शिंदे,सूर्याताई फड,उज्वला पाटील,वंदना कोळी,फुलवंती वसावे,बिंदा पावरा ,सायसिंग भिल यांनी सहकार्य केले