पुणे – पती-पत्नीचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या गर्भवती मेव्हणीचा खून केल्याचा घक्कादायक प्रकार घडला. मुन्नीबाई देवा जाधव (२५) रा. भूंडे वस्ती, बावधन असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. घरगुती वादातून सुरू असलेले पती-पत्नीचे भांडण सोडविण्यास गेलेल्या मुन्नीबाईचा तिचा दाजी व एका अल्पवयीन मुलाने खून केला. हा प्रकार बावधन येथे घडला. याप्रकरणी दाजी हिरा देवू चव्हाण (३०) रा. गांधीवस्ती, पाषाण आणि एका अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
देवा खेमू जाधव यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, हिरा आणि लक्ष्मी या दोघांमध्ये भांडण सुरू होते. हिरा पत्नी लक्ष्मीला मारहाण करत होता. त्यामुळे मुन्नीबाई भांडण सोडविण्यास गेली होती. त्यावेळी एका अल्पवयीन मुलाने मुन्नीबाईच्या डोक्यात जबर मारहाण केली, तर हिराने ढकलून दिले. यामध्ये मुन्नीबाई गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.