नवी दिल्ली- 65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे आज नवी दिल्लीच्या विज्ञान भवनात वितरण होत आहे. मात्र पुरस्कार वितरणात वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे व्यस्त वेळेमुळे सोहळा संपेपर्यंत उपस्थित राहणार नाहीत. त्यामुळे ते ११ मानकऱ्यांना सन्मानित करणार आहेत. तर काही पुरस्कार माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते दिले जाणार आहेत.
राष्ट्रपती प्रदान करणार असलेले हे अकरा पुरस्कार नेमके कोणते हे अद्याप स्पष्ट नसले तरी आधी तांत्रिक पुरस्कार आणि नंतर मुख्य पुरस्कार असा क्रम असतो, असं सूत्रांनी सांगितले. त्यामुळे राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले नाही, तर सोहळ्यावर बहिष्कार टाकू, असा पवित्रा पुरस्कार विजेत्यांनी घेतला आहे.
“स्मृती इराणींकडून पुरस्कार घेण्यास आमचा विरोध नाही, तर राष्ट्रीय पुरस्कार असून तो राष्ट्रपतींकडून न दिला जाण्याला आमचा विरोध आहे. इतर पुरस्कार सोहळ्यात आम्ही स्मृती इराणींच्या हस्ते सन्मान स्वीकारलाच असता,” असं ‘म्होरक्या’चे दिग्दर्शक अमर देवकर यांनी सांगितले. यंदा ‘म्होरक्या’ला सर्वोत्कृष्ट बालपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
ह्या पुरस्काराचे राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण
दादासाहेब फाळके पुरस्कार : विनोद खन्ना
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : श्रीदेवी, मॉम
राष्ट्रीय एकात्मतेसाठी नर्गिस दत्त पुरस्कार (फीचर फिल्म) – धप्पा (मराठी)
चित्रपटावर आधारित पुस्तक : मातंगी -मणिपूर
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (शॉर्ट फिल्म) : नागराज मंजुळे, पावसाचा निबंध
सर्वोत्कृष्ट जसारी चित्रपट : सिंजर
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायन (पुरुष) : केजे येसूदास, “पोय मारंजा कलाम” विश्वासपुरम मन्सूर (मल्याळम)
सर्वोत्कृष्ट संगीतकार : ए आर रहमान , कात्रु वेल्लीदायी -तामीळ, सर्वोत्कृष्ट बॅकग्राऊंड स्कोअर : मॉम
सर्वोत्कृष्ट अभिनेता – रिद्धी सेन (नगरकीर्तन- बंगाली)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – जयराज – (भयानकम् – मल्ल्याळम)
सर्वोत्कृष्ट चित्रपट (सुवर्णकमळ) – विलेज रॉकस्टार (आसामी), सर्वोत्कृष्ट संकलन – व्हिलेज रॉकस्टार (आसामी)