नवी दिल्ली: देशातील जनतेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला आलेल्या संकटांचा सामना करायचा असून, जुन्या खासदारांनी आपले मत मांडणे आवश्यक आहे. प्रामाणिक पणे कामे केली म्हणून पुन्हा एकदा सत्तेत आलो असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देतांना संसदेत म्हटले आहे.
आपल्या भाषणात मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत मिळालेला विजय हा पूर्णपणे पारखून दिलेला आहे. सरकारने गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाची पावती आम्हाला मिळाली आहे. कोण हारले, कोण जिंकले या गोष्टींचा मी विचार करीत नाही. या गोष्टीच्या पलीकडे जाऊन देशातील जनतेचे स्वप्न कसे पूर्ण करता येईल याचा विचार करीत असतो असे ते यावेळी म्हणाले.
जनतेने आमच्यावर इव्हीएमचे बटन दाबून विश्वास ठेवला असून, ज्यांचे कुणी नाही त्यांचे सरकार आहे. देशातील चांगल्या प्रकल्पांमुळे आधुनिकीकरणाकडे वाटचाल होत असून, जनतेशी नाते जोडून देशाचा विकास साधने हे आमचे ध्येय असल्याचे ते म्हणाले. २००४ ते २०१४ या दशकात अटलजींच्या सरकारचाब कामकाजाचे कधी कौतुक झाले नाही. आम्ही कोणाचे योगदान नाकारत नसून विरोधकांच्या स्तुतीचे आम्हाला वाडे नाही. नरसिंहराव यांच्या कार्याचा देखील तत्कालिन सरकारला विसर पडला होता. असे यांनी आज संसदेत सांगितले.