भुसावळ शहरात प्रधानमंत्री मोदींचा मन की बात कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण
भुसावळ | भारतीय जनता पार्टी भुसावळ शहर मंडल अंतर्गत प्रभाग क्रमांक ८ मध्ये देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा ९९वी आवृत्ती”मन की बात”चे थेट प्रक्षेपणाचा कार्यक्रम भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे यांच्या विशेष उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाचे आयोजन माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी व माजी नगरसेविका तथा माजी भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा मिना लोणारी यांनी केले होते.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी देशाच्या जनतेशी मन की बात या कार्यक्रमा च्या माध्यमातून हितगुज करीत असतात. पंतप्रधानांचा संदेश जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी मन की बात या कार्यक्रमाचे भव्य स्क्रीनवर थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले.
सदरील कार्यक्रमास भारतीय जनता पार्टी भुसावळ शहराध्यक्ष परिक्षित बऱ्हाटे, कार्यक्रमाचे आयोजक माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी यांच्यासह जिल्हा चिटणीस शैलेजा पाटील, माजी नगरसेविका मिना लोणारी, माजी नगरसेवक राजेंद्र नाटकर,राजेंद्र आवटे, बापु महाजन, प्रा.दिनेश राठी, नीळकंठ भारंबे,देवेंद्र वाणी, किरण कोलते, सतिश सपकाळे, अजय नागराणी, किरण महाजन, पवन बुंदेले, शहर सरचिटणीस रमाशंकर दुबे, संदीप सुरवाडे, युवा मोर्चा अध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी, जयंत माहुरकर, सुनिल सोनवणे, गुणवंत बोरोले, कैलास शेलोडे, राहुल तायडे,प्रा.विलास अवचार, संजय बोचरे, रवी ढगे, श्रेयस इंगळे, शैलेंद्र ठाकरे, गौरव लोणारी, तारकेश राणे, मुकुंद निमसे, चेतन बोरोले, भावेश चौधरी,वैभव लोणारी यांचे सह शक्तीकेंद्र प्रमुख, बुथ प्रमुख, बुथ समिती सदस्य व स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.