थिंपू: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शनिवारी भारताचा मित्र राष्ट्र असलेल्या भूतान दौऱ्यावर आहेत. सकाळी मोदी भूतानला पोहोचले. यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. भूतानला पोहोचताच त्यांना मानवंदना देण्यात आली. मोदींनी भूतान दौऱ्यादरम्यान भारतीय नागरिकांची भेट घेतली. भारतीय नागरिकांनी मोदींचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. भारत आणि भूतानचे संबंध नेहमीच सलोख्याचे राहिलेले आहे. दोन्ही देशामध्ये व्यापार मोठ्या प्रमाणात चालते.