नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाच्या उभारणीत अडवाणींचे मोठे योगदान आहे. मात्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून अडवाणी यांना बाजूला केले गेल्याची एक चर्चा सातत्याने होत असते. जुने, भाजपच्या उभारणीत मोठे योगदान असणाऱ्यांना बाजूला करण्यात मोदींचे हात असल्याच टीका देखील होत असते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी अजूनही लालकृष्ण अडवाणींना नेते आणि गुरु मानतात, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. भाजपचे संस्थापक सदस्य असलेले ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे ८ नोव्हेंबर रोजी वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी अडवाणींच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन त्यांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी मोदींनी अडवाणींचे चरणस्पर्श करत आशीर्वाद घेतले. त्यांनतर केक देखील भरविला, अतिशय भावनिक असे हे चित्र होते. एएनआय या वृत्त संस्थेने व्हिडिओ पोस्ट केला आहे.
#WATCH Delhi: Prime Minister Narendra Modi visits senior BJP leader Lal Krishna Advani's residence to celebrate latter's birthday today.
Union Home Minister Amit Shah and BJP President JP Nadda also present. https://t.co/RVEDaIzhqj pic.twitter.com/sMlrarfo8O
— ANI (@ANI) November 8, 2020