शेतकऱ्यांसाठी खुश खबर: आज मोदी सरकारकडून खात्यात जमा होणार पैसे

0

नवी दिल्ली: शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. माजी पंतप्रधान भारतरत्न स्व.अटल बिहारी वाजपेयी यांची आज २५ डिसेंबर रोजी जयंती आहे. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शुक्रवार शेतकऱ्यांच्या खात्यात शेतकरी सन्मान निधीची रक्कम जमा करणार आहेत. देशातील एकूण ९ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण १८ हजार कोटी रुपये जमा होणार आहेत. प्रत्येक शेतकऱ्याला ६ हजार रुपये मिळणार आहे. शेतकरी सन्मान योजनेचा हा ७ वा हप्ता भेट देणार आहेत.

पंतप्रधान मोदी आज देशातील सहा राज्यांमधील शेतकऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. शेतकरी सन्मान योजनेबाबतची माहिती आणि काही आठवणी पंतप्रधान मोदी यावेळी शेतकऱ्यांना सांगणार आहेत. यावेळी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर देखील उपस्थित असणार आहेत.

पंतप्रधान मोदींच्या संबोधनासाठी भाजपने ‘किसाम चौपाल’ तयार केले आहेत. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सर्व कार्यकर्त्यांना या कार्यक्रमास सामील होण्याचे आदेश दिले आहेत.